Pune ZP : झेडपीच्या बचत गटांचे आता शहरात ७५ स्टॉल

पुणेकरांना अस्सल ग्रामीण दिवाळी पदार्थांची चव चाखता येणार
pune zp
pune zpsakal

पुणे - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने यंदा विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून दिवाळीनिमित्त यंदा पहिल्यांदाच महिला बचत गटांचे दिवाळी पदार्थांच्या विक्रीसाठी पुणे शहरातील विविध भागात सात ठिकाणी स्टॉल लावण्यात आले आहेत.

झेडपीच्या प्रयत्नांमुळे या स्टॉलसाठी महापालिकेने मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे. यंदा महापालिकेच्या जोडीलाच जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाचे स्टॉलही असणार आहे. यामुळे पुणेकरांना, ग्रामीण भागातील अस्सल दिवाळी पदार्थांची चव चाखण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

यानुसार झेडपीच्या ७५ बचत गटांचे स्टॉल हे शहरात लावण्यात आले आहेत. हे स्टॉल शुक्रवारपासून (ता.३) सुरु झाले असून, येत्या गुरुवारपर्यंत (ता. ९ नोव्हेंबर) ते चालू राहणार आहेत. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने दरवर्षी दिवाळीनिमित्त शहरात विविध ठिकाणी दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री या उपक्रमाचे आयोजन केले जाते.

pune zp
Pune Crime : एक कोटी १५ लाखांचे दागिने घेऊन सेल्समन पसार

आतापर्यंत हा उपक्रम केवळ महापालिका हद्दीतील महिला बचत गटांच्या उत्पादनांपुरताच मर्यादित असे. यंदा मात्र त्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७५ बचत गटांना सामावून घेण्यात आले आहे.

पुणे शहरातील सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यान, बाणेर येथील टेलिफोन एक्सचेंजजवळ, वडगाव शेरीतील नवी भाजी मंडई, कर्वेनगर येथील नथुजी मेंगडे जलतरण तलाव, कात्रज येथील कात्रज डेअरी आवार, वाडिया महाविद्यालयाजवळील टाटा असेंब्ली हॉल आणि दांडेकर पुलाजवळील महापालिकेच्या दिवाळी बचत बाजार येथे हे स्टॉल लावण्यात आले असल्याचे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांनी सांगितले. याशिवाय पुणे जिल्हा बॅंकेच्या मुख्यालयात दरवर्षी चालू केले जाणारे बचत गटांचे स्टॉल यंदाही असणार आहेत.

बचत बाजारात दिवाळी फराळ व साहित्य

या दिवाळी बचत बाजारातील स्टॉलवर पुणेकरांना दिवाळी फराळ व दिवाळीत आवश्‍यक असणारे साहित्य मिळू शकणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा या दिवाळी पदार्थांसह वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, मांडे, सॉस, शीतपेये सोलकडी, लोणची, पापड, विविध मसाले, तयार पिठे, शेवया, कुरड्या हे नेहमीचेच खाद्य पदार्थही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

याशिवाय दिवाळीसाठी आवश्‍यक असलेल्या पणत्या, रांगोळी, दीपमाळा, आकाशकंदील या वस्तूंसह घरगुती वापरातील विविध वस्तू जसे, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे, आयुर्वेदिक उत्पादने, लेदर व कापडी पिशव्या, अगरबत्ती, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने आदी मिळू शकणार असल्याचे प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com