दिवाळीत ६६ ठिकाणी आगीच्या घटना

दिवाळीत ६६ ठिकाणी आगीच्या घटना
Published on: 

फटाक्यांमुळे दिवाळीत ६६ ठिकाणी आगीच्या घटना

सात रस्ता बस डेपोमागे गवताला आग; तीन बस आगीच्या विळख्यात
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे शहरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. ७ ते १० नोव्हेंबरदरम्यान शहरात तब्बल ६६ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. यामध्ये सात रस्ता येथील महापालिकेच्या बस डेपोच्या पाठीमागे गवतावर रॉकेट पडून परिसरातील बस पेटल्या. तीन बस आगीच्या विळख्यात सापडल्या. रॉकेटची ठिणगी सुक्या गवतावर पडल्याने ही आग लागली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार ७ नोव्हेंबर रोजी ९ ठिकाणी, ८ नोव्हेंबर रोजी २८ ठिकाणी, ९ नोव्हेंबर रोजी १६ ठिकाणी तर १० नोव्हेंबर रोजी शहरात १३ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. याशिवाय ११ नोव्हेंबर रोजी रात्री आतषबाजी करताना रॉकेट उडून महापालिकेच्या सातरस्ता डेपो परिसरात पडला. त्या ठिकाणी सुकलेला गवत असल्याने आगीने पेट घेतले. या आगीची झळ तेथे उभ्या असलेल्या तीन बसपर्यंत पोहोचली. या परिसरातील चेसीक्रॅकच्या बसेसच्या रेग्नीजला ही आग लागल्याने तीन बस जळून खाक झाल्या. दिवाळीत एकूण घडलेल्या घटनांपैकी ९५ टक्के घटना या केवळ फटाक्यांची ठिणगी पडून कुठे दुकानाला, कुठे घरामध्ये तर कुठे गोडावून तर कुठे गवताला आग लागल्याची माहिती महापालिका अग्निशामक विभागाने दिली.
-----------
तारीख : आगीच्या घटना
७ नोव्हेंबर : ९
८ नोव्हेंबर : २८
९ नोव्हेंबर : १६
१० नोव्हेंबर : १२
११ नोव्हेंबर : १
एकूण घटना : ६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.