

मार्केट यार्ड, ता. ८ : दिवाळीत नागरिकांकडून मांसाहार केला जात नसल्याने चार दिवसांपासून मासळी, मटण आणि चिकन खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. मासळीच्या आवकेसह मागणीदेखील कमी असल्याने सर्व प्रकारच्या मासळीच्या भावात ५ ते १० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. तर मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे मटण, चिकन आणि गावरान अंड्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत कायम असल्याचे मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे आणि चिकनचे विक्रेते रुपेश परदेशी यांनी सांगितले. इंग्लिश अंड्यांच्या भावात मात्र शेकड्यामागे ४१ रुपयांनी वाढ झाली आहे.
गणेश पेठ येथील घाऊक बाजारात रविवारी (ता. ८) खोल समुद्रातील मासळी ५ ते ७ टन, खाडीच्या मासळीची १०० ते २०० किलो आणि नदीच्या मासळीची १०० ते २०० किलो इतकी आवक झाली. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची मिळून ५ ते ७ टन आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव)
पापलेट : कापरी : १६००-२२००, मोठे : १५००-१७००, मध्यम : ११००-१३००, लहान : ८००-९५०, भिला : ७००-८००, हलवा : ६००-८००, सुरमई : ७००-१०००, रावस : ७००-१०००, घोळ : ७००-८००, करली : ३००-३५०, भिंग : ३००-४००, पाला : लहान : ८००-९०० मोठा : १२००-१५००, वाम : पिवळी ७००-९००, काळी : ४००-५००, ओले बोंबील : १५०-२४०, कोळंबी : लहान : १८०-२४०, मध्यम : ३६०-४८०, मोठी : ५२०-७००, जम्बो प्रॉन्स : १०००-१२००, किंग प्रॉन्स : ८००-९००, लॉबस्टर : १८००-२२००, मोरी : २००-३००, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २४०-२८०, खेकडे : ३५०-४००, चिंबोऱ्या : ६००-७००.
खाडीची मासळी :
सौंदाळे : २४०-२८०, खापी : २४०-२८०, नगली : ३५०-४००, तांबोशी : ४५०-५५०, पालू : २४०-२८०, लेपा : २५०-३००, बांगडा : २००-२५०, शेवटे : २००-२५०, बेळुंजी : १००-१५०, तिसऱ्या : २५०-३००, खुबे : १५०-१८०, तारली : २००-२५०.
नदीतील मासळी :
रहू : १४०-१८०, कतला : १६०-२००, मरळ : ३००-३५०, शिवडा : २००-२५०, खवली : १५०-२००, आम्ळी : ८०-१४०, खेकडे : २५०-३००, वाम : ४००-४५०.
मटण : बोकड : ८८०, बोलाई : ८८०, खिमा : ८८०, कलेजी : ९२०. चिकन : २५०, लेगपीस : ३००, जिवंत कोंबडी : १७०, बोनलेस : ३५०.
अंडी : गावरान (शेकडा) : १२७०, डझन : १५६, प्रतिनग : १३. इंग्लिश (शेकडा) : ७११, डझन : ९३, प्रतिनग : ८.००.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.