

सतीश वैजापूरकर
राहाता, ता.२५।१०।२६
----------------
महत्वाची व जाहिरातदार संस्थेची बातमी
------------------
SHD26B06218
शिर्डी ः युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील व संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या हस्ते साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या सभासदांना दिवाळी शिधावाटप करण्यात आले.
एम्प्लॉईज सोसायटी सभासदांची दिवाळी गोड
डाॅ. सुजय विखे ः अध्यक्ष पवार यांच्यासह संचालक मंडळाचा साडेतीन कोटी रुपये वाटपाचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
शिर्डी, ता. २५ ः साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीने प्रत्येक सभासद आणि कर्मचा-याला पन्नास किलो साखर, पंधरा लिटर खाद्यतेल आणि दोन किलो मिठाई भेट दिली. संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार व त्यांच्या सहकारी संचालकांनी दिवाळी शिधा वाटपासह एकूण तीन कोटी ५७ लाख रुपयांचे वाटप करून सर्वांची दिवाळी गोड केली, ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांनी केले.
साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने सभासद आणि कर्मचा-यांना दिवाळी शिधा वाटप करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, नगराध्यक्ष जयश्री थोरात, संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पवार, उपाध्यक्ष पोपट कोते, उद्योजक भाऊसाहेब चौधरी, साई निर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजय कोते, सेवा संस्थेचे अध्यक्ष किरण कोते, साई संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, अतुल वाघ आदी उपस्थित होते.
डाॅ. विखे पाटील म्हणाले की, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीपुढील अडचणी व समस्या सोडविण्यास आपण कटिबद्ध आहोत. भाविकांना विविध सेवा पुरविण्यास ही संस्था आघाडीवर आहे. समान शैक्षणिक पात्रता व समान अनुभव असताना काही कर्मचा-यांच्या वेतनात तफावत आहे. ती दूर करण्यासाठी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पुढाकार घ्यावा. या प्रश्नातील गुंतागूंत दूर करावी.
यावेळी बोलताना संस्थेचे अध्यक्ष पवार म्हणाले की, संस्थेने सर्व सभासदांच्या विमा रकमेत दुपटीने वाढ केली. बडोदा बॅंकेच्या वतीने सभासद खातेदारांच्या विमा रकमेत चाळीस लाख रुपयांवरून ८० लाख रुपयांपर्यंत वाढ झाली. नुकतेच कायम झालेले ४८८ कर्मचा-यांना सभासदत्व दिल्यानंतर त्यांनाही संस्थेच्या वतीने सर्व लाभ दिले जातील. साईबाबांचा आशीर्वाद आणि डाॅ. विखे पाटील यांचा विश्वास संपादन करून आम्ही संस्थेचा कारभार करीत आहोत.
---------------------------------चौकट-----------------------------------
संस्थेचे सभासद आणि कर्मचा-यांना अधिकच्या सवलती देऊन देखील यंदा एकूण वार्षिक नफ्याची रक्कम तीन कोटी रुपयांवरून पाच कोटी रुपये झाली. साई संस्थानचे सहकार्य आहे. संस्थेच्या नूतन कार्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवा नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांना साकडे घातले आहे. सभासदांचे हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेतले जात आहेत.
- विठ्ठल पवार, अध्यक्ष, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी, शिर्डी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.