

पुणे, ता. ३ : दिवाळीच्या सणानिमित्त दागिन्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ‘हाऊस ऑफ आद्या’तर्फे विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत सर्व दागिन्यांवर किमान २५ टक्के सूट, तर निवडक ५०० हून अधिक उत्पादनांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. पारंपरिक दागिन्यांच्या विविध प्रकारांसह नव्या आकर्षक रचनांचा या संग्रहात समावेश आहे.
या दिवाळीनिमित्त ९२.५ शुद्ध चांदीपासून तयार करण्यात आलेले विशेष कानातील दागिने, तन्मणी, दागिन्यांचे संच, साज आणि कुडी यांचे नवे संग्रह उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या दागिन्यांमध्ये सोन्याचा मुलामा असलेले पर्यायही उपलब्ध आहेत. मंगळसूत्र, तोडे, ब्रेसलेट, मोरणी, नथ, गजरा, चिंचपेटी, चिताक, हातफूल आणि स्वर्ण रजत अशा विविध पारंपरिक दागिन्यांचाही या संग्रहात समावेश आहे.
हाऊस ऑफ आद्याचे तीन हजारांहून अधिक प्रकारचे दागिने पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि कोथरूड, तसेच मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील दालनांमध्ये उपलब्ध आहेत. ग्राहकांना दालनांमध्ये जाऊन दागिने परिधान करून खरेदी करता येणार आहेत. तसेच संकेतस्थळ आणि दुरध्वनीवरील अनुप्रयोगाच्या माध्यमातूनही घरबसल्या खरेदी करता येणार आहे. पुणे आणि मुंबईमध्ये त्याच दिवशी घरपोच वितरणाची सुविधाही उपलब्ध आहे.
सायली मराठे यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या ब्रँडने पारंपरिक दागिन्यांना आधुनिक रचनांची जोड दिली आहे. नवनवीन डिझाइन्स आणि दर्जेदार दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘हाऊस ऑफ आद्या’च्या या विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी दालनाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.