Diwali Laxmi Puja 2022 : लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून होणार सुरू

वसुबारस, धनत्रयोदशीनंतर आता नागरिकांना प्रतीक्षा लागलीय ती लक्ष्मीपूजनाची
Diwali Laxmi Puja 2022 Muhurta of Lakshmi Puja 3 pm onwards Monday
Diwali Laxmi Puja 2022 Muhurta of Lakshmi Puja 3 pm onwards Mondayesakal
Updated on

पुणे : लखलखत्या दिव्यांचा झगमगाट, गोडधोड अन्‌ खमंग फराळ, आबालवृद्धांना नवचैतन्य देणारा असा दिवाळीचा सण सुरू झाला खरा; पण आता वसुबारस, धनत्रयोदशीनंतर आता नागरिकांना प्रतीक्षा लागलीय ती लक्ष्मीपूजनाची. होय, यंदा सोमवारी (ता. २४) लक्ष्मीपूजन असून त्याची जय्यत तयारी घरोघरी सुरू असल्याचे पाहायला मिळते. यावर्षी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू होणार असून रात्रीपर्यंत असणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसभरात कधीही पूजा करता येणार आहे.

शरद ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. यावर्षी नरक चतुर्दशी सोमवारी असून या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले जाते. तर लक्ष्मी-कुबेर पूजनही याच दिवशी आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घर, दुकान स्वच्छ व सुशोभित करून सूर्यास्तानंतर लक्ष्मी व कुबेर यांचे पूजन करून ऐश्वर्य, संपत्ती, समृद्धीसाठी प्रार्थना करायची असते. या पूजेत समृद्धीचे प्रतीक म्हणून साळीच्या लाह्या आवश्यक असतात, असे दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले आहे. यावर्षी सोमवारी दुपारी ३ ते रात्री १२ पर्यंत लक्ष्मीपूजन करता येईल, असेही त्यांनी सांगितले.

लक्ष्मीपूजनचा मुहूर्त (सोमवारी, ता. २४) :

  • दुपारी ३ ते सायंकाळी ६ पर्यंत

  • सायंकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत

  • रात्री १०.३० ते १२ पर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com