‘दिवाळी पहाट’मध्ये रंगला पक्के पुणेकर सन्मान सोहळा

‘दिवाळी पहाट’मध्ये रंगला
पक्के पुणेकर सन्मान सोहळा
Published on: 

पुणे, ता. ८ : आकर्षक रांगोळी, दिव्यांची सजावट आणि सनई-चौघड्यांच्या मंगल सुरांनी सजलेल्या पुण्यभूषणच्या ३८ व्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमात पाच मान्यवरांना ‘पक्के पुणेकर’ सन्मानाने गौरविण्यात आले. या सोहळ्यात उमेश झिरपे, ॲड. एस. के. जैन, युवराज शहा यांच्यासह ब्राह्मण मंगल कार्यालय आणि नाईस हेअर ड्रेसर्स या संस्थांना सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी श्रमिकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता मनोहर यांना पंडिता डॉ. सुजाता नातू स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच शिरीष रायरीकर यांना पुण्यभूषण कार्यकर्ता कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुण्यभूषण फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे सुशील जाधव, फाउंडेशनचे कार्याध्यक्ष काका धर्मावत आदी उपस्थित होते. मुक्ता मनोहर यांच्या मानपत्राचे वाचन मोहन टिल्लू यांनी केले, तर दिलीप कुंभोजकर यांनी सन्मानार्थींचा परिचय करून दिला.
सन्मान सोहळ्यानंतर नीश एन्टरटेन्मेंट प्रस्तुत ‘गाता रहे मेरा दिल’ हा संगीत कार्यक्रम झाला. मिलिंद ओक यांची संकल्पना व दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमात अभिलाषा चेल्लम, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी आणि मालविका दीक्षित यांनी गीते सादर केली. नचिकेत देवस्थळी यांनी निवेदन केले. अभिषेक हावरगी, ऋतुजा इंगळे, अजय कणसे आणि रिया देसाई या नृत्य कलाकारांनी साथसंगत केली. नील देसाई यांनी स्वागत केले, तर समीर देसाई यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सतीश देसाई यांनी आभार मानले.
फोटो ः 64998

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.