

पिंपरी, ता. २९ ः दिवाळीनिमित्त घरांची साफसफाई करताना वापरात नसलेल्या मात्र सुस्थितीत असलेल्या वस्तू फेकून दिल्या जातात. त्यांचा पुनर्वापर व्हावा, त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने महापालिकेच्या आरोग्य विभागाने व स्वच्छ संस्थेने ‘आरआरआर’ (रिड्यूस, रीयूज, रिसायकल) कलेक्शन ड्राईव्ह आयोजित केला आहे. याअंतर्गत ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहरातील गृहनिर्माण संस्थांमध्ये वस्तू संकलन मोहीम राबविली जाणार आहे.
दिवाळीनिमित्त साफसफाई करताना कपडे, पुस्तके, शैक्षणिक साहित्य, खेळणी, भांडी, चादरी, पडदे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजूला काढल्या जातात. त्या फेकून देण्याऐवजी गरजूंच्या उपयोगी येऊ शकतात. यासाठी महापालिकेच्या विशेष मोहिमेतून वापरण्यायोग्य वस्तूंचा अपव्यय टाळण्यास, कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास, पर्यावरणाचे संवर्धन करण्यास आणि गरजू व्यक्तींना उपयुक्त वस्तू उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे. यात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
टाकाऊ वस्तू संकलन ठिकाणे
- शनिवार, ३१ ऑक्टोबर ः रेनबो व्हिस्टा, आहेरनगर; सिद्धिविनायक विंड चाइम, रहाटणी; द वुड्स, वाकड; अक्षर एलिमेंटा व पॅलॅडिओ अपार्टमेंट, ताथवडे; द्वारका सनक्रेस्ट फेज १ व यश संकुल, पिंपळे सौदागर; ओमेगा पॅराडाइज, होरायझन्स ॲट वाकड व ला मेलोसा, वाकड; भूमी ओराबेल, सेलेस्टियल सोसायटी फेज २, राजलक्ष्मी ग्रीन्स सोसायटी, उदय हिलटॉप रेसिडेन्सी, संत ज्ञानेश्वर उद्यान व चंद्रभागा कॉर्नर, रावेत; रेणुका पंचतत्त्व, ताथवडे.
- रविवार, १ नोव्हेंबर ः वुड्सव्हिल फेज १, फेज २ व फेज ३, लोटस नंदवन फेज १, कुमार प्रिन्सव्हिल फेज १ आणि सेंट्रल पार्क रेसिडेन्सी, मोशी; रिव्हर रेसिडेन्सी फेज ३, चिखली; ऐश्वर्यम, आकुर्डी; गोखले वृंदावन, चिंचवड; ट्युलिप इन्फिनिटी वर्ल्ड, पुनावळे; मिलेनियम पॅसिफिक, वसंत ॲव्हेन्यू, ताथवडे; निसर्ग किरण, रहाटणी; गंगा स्काइज सोसायटी, वल्लभनगर, पिंपरी आणि कुमार प्रथम, मोशी. अधिक माहितीसाठी संपर्क ः ७०३०९०१९९३, ९१६८६८४६७०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.