३८ संस्थांतील ५ हजार गरजूंना मायेच्या फराळाची भेट

३८ संस्थांतील ५ हजार गरजूंना मायेच्या फराळाची भेट
Published on: 

PNE26W63508 - गरजूंना फराळ वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, उद्योगवर्धिनीच्या चंद्रीका चौहान व अन्य मान्यवर

३८ संस्थांतील ५ हजार गरजूंना मायेच्या फराळाची भेट
दुष्काळात बैल सांभाळणाऱ्या १०० शेतकऱ्यांनाही फराळ - केतन वोरा मित्रपरिवार, उद्योगवर्धिनीतर्फे सेवा

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता.२ :
दिवाळीचा फराळ प्रत्येकाच्या घरी होतोच असे नाही. मात्र, सणाचा आनंद सर्वांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून केतन वोरा मित्रपरिवार आणि उद्योगवर्धिनी संस्थेने ३८ संस्थांमधील पाच हजार गरजूंना मायेने फराळाची भेट दिली. चिवडा, लाडू, शंकरपाळी, चकली अशा फराळासह सनईच्या मंगल सुरांत आणि कुटुंबातील सदस्याप्रमाणे केलेल्या स्वागताने या उपक्रमाला आपुलकीची जोड मिळाली. दुष्काळातही बैल बाजारात न विकता त्यांना सांभाळणाऱ्या १०० शेतकऱ्यांनाही यानिमित्ताने फराळ देण्यात आला.
उद्योगवर्धिनी संस्थेत हा कार्यक्रम झाला. उपक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते. यावेळी प.पू. श्री मल्लीश्रीजी महासती, प.पू. श्री विभवश्रीजी महासती, आमदार देवेंद्र कोठे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, शारदादेवी आसावा, डॉ.नवनीत तोष्णीवाल, इंदरमल जैन, रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे अध्यक्ष मितेश पंचमीया, केतन वोरा, उद्योगवर्धिनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान आदी उपस्थित होते.
---------------------------------------
१० सामाजिक संस्था, १० पालावरच्या शाळा, चार ग्रामीण वस्त्या, ११ शाळा, ४०७ दिव्यांग आणि ५०० वंचित व बेघर अशा घटकांतील गरजूंना फराळ देण्यात आला. या माध्यमातून पाच हजार गरजूंना दिवाळीचा आनंद देण्यात आला.
-----------------------------------------
प. पू. श्री मल्लीश्रीजी महासती म्हणाल्या, उत्पन्नातील काही भाग गरजूंना देण्याची भावना उदात्त आहे. उत्पन्नातील पैसा व्यसनांवर खर्च करण्याऐवजी आदर्शयुक्त जीवनाचा अंगीकार करावा. आमदार देवेंद्र कोठे यांनी गरजूंना मुख्य प्रवाहात आणण्याची तळमळ आणि समाजाप्रतीची कर्तव्यभावना यातून दिसते असेही ते म्हणाले. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, आपले शहर या भावनेतून प्रत्येकाने काम केल्यास संपूर्ण समाजाची प्रगती होईल. सामाजिक उपक्रमांना महापालिकेचे कायम सहकार्य राहील. चंद्रिका चौहान यांनी सूत्रसंचालन केले, तर केतन वोरा यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.