पाच हजार कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

पाच हजार कुटुंबांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!
Published on: 

GHR26A09680
काटवनवाडी (ता. संगमनेर) ः येथील आदिवासी वस्तीवर रात्री भेट देऊन आमदार अमोल खताळ यांनी आदिवासी महिलांना दिवाळीचा शिधा वाटप केला.


गरिबांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद
अमोल खताळ यांचा स्तुत्य उपक्रम; दुष्काळात घरात पेटविला दिवा
संगमनेर, ता. ९ ः सणासुदीच्या दिवसांत प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असावे, लहान मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे यासाठी घरात आनंदाचा दिवा प्रज्वलित व्हावा, या भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अमोल खताळ यांनी तालुक्यातील अनेक गावांसह दुर्गम भागातील आदिवासी वाड्या-वस्त्यांवर जाऊन पाच हजारांहून अधिक गरजू कुटुंबांना दिवाळीचा शिधा घरपोच केला.

यासोबतच महिलांना साड्या, कुटुंबांना मिठाई, तर लहान मुलांना फटाक्यांचे वाटप करून त्यांच्या दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. केवळ मदत देण्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष बांधावर, वाड्या-वस्त्यांवर आणि घराघरांत जाऊन गरजूंची विचारपूस करत त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा प्रयत्न आमदार खताळ यांनी केला.

परिस्थिती लक्षात घेऊन कोणत्याही परिस्थितीत गरीब आणि गरजू कुटुंबांची दिवाळी आनंदात साजरी झाली पाहिजे, असा निर्धार आमदार खताळ यांनी केला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील गावोगावी आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांवर दिवाळीचा शिधा पोहोचविण्याचे नियोजन केले. विशेष म्हणजे, हा शिधा केवळ एका ठिकाणी बोलावून वाटप न करता अनेक कुटुंबांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात आला.
तालुक्यात एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत जाऊन दिवाळीचा शिधा वाटप करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याची भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली. दुष्काळाच्या कठीण काळात गरजूंच्या घरापर्यंत मदतीचा हात पोहोचवून आमदारांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
--------------
स्वतः वाड्या-वस्त्यांवर
अमोल खताळ यांनी स्वतः या वाटपात सहभाग घेतला. रात्री १० ते ११ वाजेपर्यंत दुर्गम वाड्या-वस्त्यांवर फिरून त्यांनी गरजू कुटुंबांची भेट घेतली. त्यांना दिवाळीचा शिधा दिला. दिवसभराच्या कामकाजानंतरही रात्री उशिरापर्यंत वाड्या-वस्त्यांवर जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. महिलांना साड्या, मिठाई आणि लहान मुलांना फटाके देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.