दिवाळीत राजपथावर वाहनांना नो एन्ट्री

दिवाळीत राजपथावर वाहनांना नो एन्ट्री
Published on: 

दिवाळीत राजपथावरील वाहतुकीत बदल
सातारा, ता. ७ : दिवाळीनिमित्त राजपथावरील बाजारपेठेतील खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेत सातारा शहर वाहतूक शाखेने येथील वाहतुकीत बदल करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यानुसार भाऊबीजेपर्यंत राजपथावर चारचाकी वाहनांना बंदी करण्‍यात आली असून, शक्‍यतो नागरिकांनी दुचाकीचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेच्‍या वतीने करण्‍यात आले आहे. या मार्गावर येणारी वाहने शाहू चौकातून वळवण्‍यासाठी कर्मचारी नेमण्‍यात येणार आहेत.
दिवाळीच्‍या सणानिमित्ताने गेल्‍या आठवड्यापासून राजपथाच्‍या दुतर्फा असणाऱ्या बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. याच रस्त्यावरून वाहनांची ये- जा सुरू असल्‍याने वाहतूक कोंडी होण्‍यासह पादचाऱ्यांना जास्‍तीचा त्रास सहन करावा लागत होता. कोंडी लक्षात घेत शहर वाहतूक शाखेने कर्मचारी नेमले, मात्र त्‍यांच्‍या कामावर देखील गर्दीमुळे मर्यादा पडत होत्‍या. यामुळे मोती चौकापासून चारचाकी, तसेच इतर मोठी वाहने सोडण्‍याचे बंद करण्‍यात आले, तरीही कोंडी होत असल्‍याने वाहतूक शाखेने भाऊबीजेपर्यंत या मार्गावर चारचाकी, तसेच इतर मोठी वाहने येणार नाहीत, यासाठी वाहतुकीत बदल करण्‍याचा निर्णय घेतला. यानुसार त्‍याचा आराखडा तयार करत शाहू चौकापासून मोती चौकाकडे येणाऱ्या वाहनांना रोखण्‍याचा निर्णय घेत त्‍याची कार्यवाही सुरू करण्‍यात आली आहे. खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्‍या वाहनांसाठी राजवाडा येथील अळूचा खड्डा, तसेच तालीम संघाच्‍या मैदानावर वाहनतळ करण्‍यात आले आहे. रिक्षांसह इतर सर्वच वाहने राजपथाच्‍या दुतर्फा लावण्‍यास वाहतूक शाखेने मनाई केली आहे. वाहतूक नियमांचे पालन करत शक्‍यताे दुचाकीचा वापर करण्‍याचे आवाहन सातारा शहर वाहतूक विभागाचे सहायक निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.