

राहू, ता. २६ : देवीच्या मिरवणुकीत चार डीजे साउंड सिस्टीमच्या माध्यमातून मोठ्या आवाजात गाणी लावून गोंधळ घातल्याप्रकरणी यवत पोलिसांनी थोरली विहीर (ता. दौंड) येथील १३ तरुणांसह इतर २५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही घटना रविवारी (ता. २५) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
याप्रकरणी पोलिस हवालदार कृष्णा महात्मे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संतोष तासगावकर आणि सहाय्यक फौजदार संतोष कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरवणुकीत डीजेसमोर धिंगाणा करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही त्यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. शासकीय कर्तव्य बजावत असताना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी समाधान ईश्वर गाढवे, आप्पा जगदाळे, संग्राम सोनवणे, विजय कुंभार, आदित्य शिंदे, सार्थक चव्हाण, ओम सोनवणे, शंभू रामभाऊ कुल, भाऊ गाढवे (सर्व रा. राहू, ता. दौंड), अथर्व पुणेकर (रा. मांजरी, ता. हवेली), कृष्णा कोळपे, मनोज लोणकर (रा. केडगाव, ता. दौंड), महेश तायगुडे व इतर २५ अनोळखी व्यक्तींवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डीजेच्या कर्कश आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना हृदयविकाराचे व कानाचे गंभीर आजार होऊ शकतात. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती ११२ क्रमांकावर द्यावी. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डीजे मालकांसह तरुणांवर कठोर कारवाई केली जाईल.
- संतोष तासगावकर, निरीक्षक, यवत पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.