Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

सणासुदीतील डीजे, फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजामुळे पाळीव व भटके प्राणी, पक्षी, वटवाघुळे आणि सरपटणारे प्राणी प्रचंड तणावाखाली; कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्क्यांनी वाढ
Loud DJ music puts animals at serious risk.

Loud DJ music puts animals at serious risk.

Sakal

Updated on

प्रज्वल रामटेके

पुणे : गणेशोत्सव, दहीहंडी, पोळा आणि दिवाळी अशा सणांच्या काळात डीजे आणि फटाक्यांच्या कर्णकर्कश आवाजाचा परिणाम केवळ नागरिकांवरच नव्हे, तर पाळीव, भटके प्राणी आणि पक्ष्यांवरही होत आहे. प्रचंड आवाज आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे प्राण्यांमध्ये भीती, मानसिक तणाव, आक्रमकता तसेच कानाच्या विकारांच्या तक्रारी वाढत आहेत. सणासुदीच्या काळात कानाच्या विकारांशी संबंधित प्राण्यांच्या रुग्णसंख्येत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे पशुवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com