Dj Sound System
sakal
पुणे - ‘लॉकडाउननंतर साऊंड व्यवसायाला शिथिलता मिळाल्याने स्पर्धा वाढली, प्रेशर मिडची संख्या वाढली आणि कर्कश आवाजही वाढला. ही आमच्याकडून झालेली चूक आहे. आता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच व्यवसाय करू,’ अशी स्पष्ट कबुली पुणे जिल्हा साऊंड, लाइट, जनरेटर सिस्टिम असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘दोन बेस एकत्र करून प्लायवूड लावून जे केले जायचे, त्याला लोकांनी प्लाझ्मा नाव दिले; ती एक प्रकारची पळवाट होती,’ असेही काळभोर यांनी सांगितले.