सोमठाने नलावडे हाणामार सुधारित बातमी.

सोमठाने नलावडे हाणामार सुधारित बातमी.
Published on

डीजेच्या स्टेटसवरून दोन गटांत हाणामारी
पाथर्डी तालुक्यातील घटना ः गुन्हा दाखल


पाथर्डी, ता.१२ ः सोशल मीडियावर ठेवलेल्या डीजेच्या स्टेटसवरून दोन गटांत हाणामारी झाली. ही घटना तालुक्यातील सोमठाणे नलवडे येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी फिर्याद दाखल केल्या आहेत. एकूण ५३ जणांसह काही अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीमध्ये आठ महिलांचाही समावेश आहे.

पोळा सणाच्या दिवशी गावात डीजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीचे स्टेटस काहींनी सोशल मीडियावर ठेवले. त्यामुळे दोन गटांत वाद निर्माण झाला. गावातील मंदिराजवळ, तसेच झोपडपट्टी परिसरातील रस्त्यावर दोन्ही गट आमनेसामने आले आणि हाणामारी झाली.
याप्रकरणी एका गटाकडून रामदास शंकर काकडे यांनी फिर्याद दाखल केली. काकडे यांच्या फिर्यादीनुसार २६ आरोपींचा समावेश करण्यात आला आहे. दुसरी फिर्याद सुनील विनायक दौंडी यांनी दिली आहे. त्यामध्ये २७ आरोपींची नावे टाकण्यात आली आहेत. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. या घटनेने सध्या सोमठाणे नलवडे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या हाणामारीत लाकडी दांडके, लोखंडी गजाचा वापर करण्यात आला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमी झालेल्या एकावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
...........
यापूर्वीही वादाच्या घटना

सोमठाणे नलावडे गावात या पूर्वीही दोन गटांत वाद होण्याच्या घटना घडल्या आहेत. या वादावर पोलिसांनी हस्तक्षेप करून या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे झाले आहे.
......
दोन्ही गटांतील एकूण १३ आरोपींना आम्ही अटक केली आहे. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करू. सोमठाणे नलवडे गावातील तणाव दूर करणार आहोत.
-आनंद कोकरे, पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com