
विश्रांतवाडी : धानोरी- लोहगाव रहिवासी संघटना (DLRA) यांच्या वतीने आज विविध नागरी प्रश्नांसाठी "जन आक्रोश मूक धरणेआंदोलन" धानोरी जकात नाका येथे यशस्वीरीत्या पार पडले. यामध्ये शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून गंभीर नागरी समस्या मांडल्याः. यात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा, वारंवार आणि अनियोजित वीजपुरवठा खंडित होणे, रस्त्यांची दुरवस्था व पादचारी मार्गाचा अभाव, पोलिस ठाण्याचा अभाव व सुरक्षिततेची कमतरता, नेहमी होणारी वाहतूक कोंडी व नियोजनाचा अभाव आदी समस्या मांडण्यात आल्या.