‘डीएमएच यूबीईकॉन २०२६’ परिषद उत्साहात

‘डीएमएच यूबीईकॉन २०२६’ परिषद उत्साहात
Published on

पुणे, ता. ८ : मणक्याच्या शस्त्रक्रियेतील अत्याधुनिक युनिलॅटरल बायपोर्टल एन्डोस्कोपी (यूबीई) या तंत्रज्ञानाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यांना चालना देण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या स्पाइन विभागातर्फे ‘डीएमएच यूबीईकॉन २०२६’ ही आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच आयोजित करण्यात आली.
या परिषदेत देशभरातील ११० मणका शल्यचिकित्सक सहभागी झाले होते. पोर्तुगाल, थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि सिंगापूरसह विविध देशांतील आठ आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनीही परिषदेत सहभाग घेतला. त्यांनी आपले अनुभव, शल्यचिकित्सेतील कौशल्ये आणि अद्ययावत ज्ञान भारतीय मणका शल्यचिकित्सकांसमवेत शेअर केले. त्यामुळे आधुनिक स्पाइन सर्जरीच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाला नवी दिशा देणारा हा उपक्रम ठरला.
मणक्याच्या अनेक विकारांवर शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या शरीरावर कमीत कमी छेद, स्नायू आणि पेशींना कमी इजा, तुलनेने कमी वेदना आणि लवकर पुनर्वसन ही ‘यूबीई’ तंत्राची वैशिष्ट्ये आहेत. भारतात या तंत्रज्ञानाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मणका विभागाने स्थापन केलेली डीएमएच यूबीई अकादमी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या अकादमीचे नेतृत्व डॉ. अमोल रेगे आणि डॉ. रोहित कविश्‍वर करत आहेत.
-----------------------
यूबीई तंत्रज्ञान मणक्याच्या उपचारपद्धतीत मोठा बदल घडवून आणत आहे. हे तंत्रज्ञान सुरक्षित आणि प्रभावीपणे आत्मसात करण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष अनुभव देणे हा ‘डीएमएच यूबीई’ अकादमीचा उद्देश आहे.
- डॉ. अमोल रेगे, डीएमएच यूबीई अकादमी
----------------
ही केवळ आंतरराष्ट्रीय परिषद नव्हती, तर विचार, अनुभव आणि कौशल्य यांची देवाणघेवाण करणारे व्यासपीठ होते. देश-विदेशातील तज्ज्ञ आणि भारतीय शल्यचिकित्सक यांच्यातील संवादातून स्पाइन सर्जरीचे नवे क्षितिज खुले होत आहे.
- डॉ. रोहित कविश्‍वर, डीएमएच यूबीई अकादमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com