dnyanai book
sakal
पुणे - २०२५ हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचे ७५० वे जयंती वर्ष म्हणून साजरे करण्यात आले. ‘ज्ञानेश्वरी’ हे मराठी भाषेचे अक्षरलेणे आहे. परंतु, त्यामधील तत्कालीन मराठी भाषा आजच्या वाचकांना काहीशी कठीण वाटू शकते, हे जाणून संत ज्ञानेश्वरांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षाचे औचित्य साधून सकाळ प्रकाशनाने पुढाकार घेतला आहे.