यादववाडी विद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’
परिंचे, ता. २७ : ‘‘ज्ञानेश्वरीतील ज्ञानानेच मराठी भाषा समृद्ध झाली. अभंग कधीच भंग होत नाहीत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये ‘वाचन चळवळ’ रुजविण्यासाठी ग्रंथप्रदर्शने महत्त्वाची आहेत. पुस्तक वाचले तरच मुलांचे मस्तक सुधारेल,’’ असे प्रतिपादन हरगुडे ग्रामविकास संस्थेच्या संचालिका सेवानिवृत्त प्रा. पूजादेवी भोसले यांनी केले.
यादववाडी (ता. पुरंदर) येथील माध्यमिक विद्यालयात कविवर्य ‘कुसुमाग्रज’ अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त ग्रंथदिंडी व ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी भोसले बोलत होत्या.
याप्रसंगी पुरंदर तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष महेंद्र भोसले, विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र शिरसाठ, हनुमंत निगडे यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. अबोली भोंगळे, शमशुद्दीन तांबोळी, दीपक भोसले आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. वसंत ताकवले यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक दिलीप नेवसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

