Pune : 'पॅनकार्ड क्लब' घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करा; गुंतवणूकदारांची मागणी

Pune : 'पॅनकार्ड क्लब' घटनेची सीबीआयमार्फत चौकशी करा; गुंतवणूकदारांची मागणी

पुणे : राष्ट्रशक्ती इन्व्हेस्टर्स को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच पॅनकार्ड क्लबची राखरांगोळी करणाऱ्या सेबीचा निषेधही करण्यात आला असून, सीबीआय चौकशी करण्याची मागणी आज (शुक्रवार) गुंतवणूकदारांनी केली .

पॅनकार्ड क्लबमध्ये देशातील 52 लाख गुंतवणूकदारांच्या असलेल्या रकमा विशेषतः शेतकरी वर्गाच्या असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. गेल्या चार दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लबच्या इमारतीला आग लागून   गुंतवणूकदारांना सर्वात मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देणाऱ्या घटनेची बाब संशयास्पद असून, सेबीचे अधिकारी व लँडमाफिया यांच्या कटकारस्थानाने ही बाब घडून आली आहे, असा आरोप सचिव शाहजी अडसूळ यांनी केला आहे.

केंद्र सरकारने यावर त्वरीत सीबीआय चौकशी करून गुंतवणूकदारांचा परतावा करून राज्य शासनानेही शिफारस करावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. 

पॅनकार्ड क्लबमध्ये विशेषतः गोरगरिबांच्या गुंतवणूक असून, त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. 2017 साली सेबीच्या अखत्यारीत जाऊन पॅनकार्ड क्लबजवळ असलेल्या मिळकती विकून त्या गुंतवणूकदारांना देण्यात येतील, असे सांगण्यात आले.

तसेच पुण्यातील बाणेरमधील इमारतीला लागलेली आग ही सेबीने केलेल्या दुर्लक्षामुळे घडली आहे .केंद्र सरकारने या सर्व बाबींची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com