Indapur News : बेलवाडीतील महाबॅकेची शाखा बंद करु नका; महिलांची मागणी

बेलवाडीमध्ये डिसेंबर २०१२ मध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र ची नव्याने शाखा सुरु करण्यात आली होती.
Do not close branch of bank of maharashtra in Belwadi Demand of women indapur
Do not close branch of bank of maharashtra in Belwadi Demand of women indapurSakal

वालचंदनगर : बेलवाडी (ता.इंदापूर) येथे बॅंक आॅफ महाराष्ट्र ची शाखा बंद करु करुन दुसऱ्या शाखेमध्ये विलीनीकरण करु नये यासाठी बेलवाडी परीसरातील शेतकरी, महिला बचत गटातील महिला व नागरिक आक्रमक झाले आहेत.

बेलवाडीमध्ये डिसेंबर २०१२ मध्ये बॅंक ऑफ महाराष्ट्र ची नव्याने शाखा सुरु करण्यात आली होती. या शाखेमध्ये बेलवाडी,थोरातवाडी, मानकरवाडी , उदमाईवाडी, जांब, कुरवली, उद्धट, तावशी तसेच चव्हाणवाडी, बंबाडवाडी,मोहितेवाडी, कर्दनवाडी, पवारवस्ती परीसरातील शेतकऱ्यांची , नागरिकांची तसेच महिला बचत गटातील अनेक महिलांची खाते आहेत.

महिलांना गावाजवळ बॅंक असल्याने बॅंकिंग व्यवहार करण्यास सोपे जात आहे. मात्र बॅकेच्या वरिष्ठ कार्यालयाकडून बेलवाडीची शाखा बंद करुन सर्व खाते लासुर्णेमध्ये शाखेमध्ये विलिनीकरण करण्याचा आदेश वरिष्ठ कार्यालयाकडून आला आहे. बेलवाडीची शाखा बंद करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

आज सायंकाळी पाच वाजता बेलवाडीमधील मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन करुन बुधवार (ता. २७) रोजी रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी इंदापूर तालुका दुधगंगा दूध संघाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, बेलवाडी सरपंच मयुरी जामदार,

Do not close branch of bank of maharashtra in Belwadi Demand of women indapur
Indapur News : इंदापूर तालुक्यातील गलांडवाडी नंबर एक येथे राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी

थोरातवाडीचे सरपंच साधना निकम, शुभम निंबाळकर, प्रकाश शेळके, अनिल कदम,, तानाजी खैरे, सागर दुगड, बाळासो पवार, प्रकाश खैरे पाटील सुजित गायकवाड,बाळासाहेब नगरे ग्रामपंचायत सदस्य पंकज जामदार ,अमोल दुगड, सविता जामदार, अशोक जामदार,संजय पवार, सुरेखा शिंदे, निलम शेळके,अर्चना पवार,मंजुश्री जामदार,सुरबाला जामदार यांच्यासह ग्रामस्थ होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com