उघड्यावर केरकचरा टाकल्यास कायदेशीर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे ही आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. 

कामशेत : खडकाळा ग्रामपंचायतीच्या हद्दीत रस्त्यावर तसेच उघड्यावर केरकचरा टाकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शहरातील कचरा समस्येने उग्र रूप धारण केले आहे. नागरिकांना वेळोवेळी आवाहन करूनही त्याकडे नागरिक कानाडोळा करीत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि निर्जंतुककरणावर भर दिला आहे. शहरातील गल्लीबोळात स्वच्छता आणि निर्जंतुक करण करण्यात येत आहे. 

सर्वाधिक कचऱ्याचे ढीग सहारा काँलनी,नाणे व चिखलसे रोड, इंद्रायणी काॅलनी ,मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गालगत,बाजारपेठेत, शाळेजवळ असायचे. ग्रामपंचायतीने या दहा दिवसात स्वच्छतेवर भर दिला आहे. ग्रामपंचायत कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून शहराची स्वच्छता करीत आहेत. याकडे कानाडोळा करून वाटेल तेथे कचरा टाकल्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे. 

सरपंच रुपाली शिंनगारे ,उपसरपंच संतोष कदम,गणपत शिंदे, अभिमन्यू शिंदे, सारिका शिंदे ,सारिका घोलप ,काशिनाथ येवले,नितिन गायखे,जनाबाई पवार ,सरिता पवार. ग्रामविकास अधिकारी प्रताप माने यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे आहेत. कृपया शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना पाळा.सार्वजनिक कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे टाळा, स्वच्छता राखा, आपले हात सतत स्वच्छ ठेवा, शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड, रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका. ताप असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल आणि खोकला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे ही आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Do not throw Garbage on Other Places will take Action