'गोल्ड' पटकावणाऱ्या 'नीरज'चं पुण्याशी असलेलं कनेक्शन माहितीय का?

Neeraj Chopra 2
Neeraj Chopra 2Instagram

पुणे : अवघ्या भारतीयांचे डोळे ज्या क्षणांसाठी अक्षरशः आतुरलेले होते, तो "सुवर्णक्षण' पाहण्याची संधी "टोकीओ ऑलिम्पिक' स्पर्धेत भालाफेक या खेळामध्ये नीरज चोप्रा यांनी शनिवारी "सुवर्णपदक' जिंकून देत दिली. भारतीयांसाठी हा "सुवर्णक्षण' देणारे नीरज चोप्रा हे भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामध्ये सुभेदार पदावर कार्यरत असल्याचा आनंद दक्षिण मुख्यालयाने व्यक्त केला आहे. विशेषतः त्यांचे प्रशिक्षण पुण्यात झाले असल्याने पुणेकरांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरली आहे.

Neeraj Chopra 2
'आर्मी मॅन'मुळे टोकियोत वाजली 'जन-गण-मन'ची धून; नीरजला गोल्ड

"टोकीओ ऑलिम्पिक'मध्ये आत्तापर्यंत भारताला "सुवर्ण पदक' प्राप्त झाले नव्हते, नीरज चोप्रा यांच्या माध्यामातून हे सुवर्णपदक भारतीयांना पहायला मिळेल, अशी कोट्यावधी भारतीयांना शाश्‍वती होती. त्यानुसार, शनिवारी कोट्यावधी भारतीय अक्षरशः डोळ्यात प्राण आणून नीरज चोप्रा यांची स्पर्धा दूरचित्रवाणीवरून पहात होते. सायंकाळी चोप्रा यांनी भालाफेकमधील आपले कसब पणाला लावत सर्वाधिक लांब भाला फेकला आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला. त्याचवेळी हा जल्लोष भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयामध्येही तितक्‍याच दिमाखात झाला. त्याला कारणही तसेच होते. सुवर्णपदकाचा वेध घेणारे नीरज चोप्रा हे दक्षिण मुख्यालयामध्ये सुभेदार या पदावर कार्यरत आहेत. चोप्रा हे मुळचे हरियाणाच्या पानीपत जिल्ह्यातील खांदरा गावातील रहिवासी आहेत. ते 26 ऑगस्ट 2016 मध्ये नायब सुभेदार पदावर भारतीय लष्करात "ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर' (जेसीओ) म्हणून रुजू झाले. एकीकडे देशसेवा करत असतानाच दुसरीकडे ते भालाफेक या खेळामध्ये आपले कर्तृत्व गाजवित आहेत. तर 2018 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने आणि 2021 मध्ये त्यांना नेत्रदीपक कामगिरीसाठी विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवण्यात आले आहे.

Neeraj Chopra 2
पेगॅससवर चर्चा का नाही? गदारोळामुळे राज्यसभेचे ६० तास वाया

"टोकीओ ऑलिम्पिक' स्पर्धेत चोप्रा यांनी 87.58 मीटर भालाफेक करत "ट्रॅक अँड फिल्ड' प्रकारात सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास रचला आहे. या विजयामुळे त्यांनी भारतीय लष्करासह देशाचेही नाव जगात उंचावले. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल, तसेच भारतीय लष्कर आणि संपूर्ण देशाचा गौरव वाढवल्याबद्दल दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे एस नैन यांनी चोप्रा यांचे अभिनंदन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com