Indapur News : इंदापूर येथे दवाखान्यातच डॉक्टरांना मारहाण;तिघांविरोधात गुन्हा दाखल, डॉक्टर संघटनेकडून निषेध व्यक्त
Crime News : इंदापूरमधील साईसेवा क्लिनिकमध्ये डॉ. प्रदीप दडस यांच्यावर लोखंडी स्टुलने हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे वैद्यकीय वर्तुळात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी सुरू आहे.
इंदापूर शहरातील साईसेवा क्लिनिकमध्ये डॉ.प्रदीप दडस यांना लोखंडी स्टुल ने जबर मारहाण केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघा जणांविरोधात इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.