esakal | रुग्णाच्या मृत्यूनंतर बारामतीत डॉक्टरांना मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

रुग्णाच्या मृत्यूनंतर बारामतीत डॉक्टरांना मारहाण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अथक कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर आता हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.

रुग्णाच्या मृत्यूनंतर बारामतीत डॉक्टरांना मारहाण

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अथक कार्यरत असलेल्या डॉक्टरांवर आता हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. बारामतीत काल रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर काही डॉक्टरांवर अर्वाच्य शिवीगाळ करत धक्काबुक्की करुन मारहाणीचा प्रकार घडला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संदर्भात भूलतज्ज्ञ डॉ. सुजित दामोदर अडसूळ यांनी बारामती शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे काल (ता. 10) रात्री साडेदहा वाजता शहरातील डॉ. राहुल जाधव यांच्या आरोग्य हॉस्पिटल येथे एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर शिवाजी जाधव (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याने बेकायदा प्रवेश करुन संबंधित रुग्णाच्या मृत्यूचा जाब विचारत या ठिकाणी असलेल्या परिचारिकांबाबत अश्लिल हावभाव करत अर्वाच्य विधाने केली, तुमच्याकडे बघून घेतो, जिवंत सोडणार नाही, अशा स्वरुपाची दमदाटी केली. हे करताना त्याने हाताने मारहाण करुन धक्काबुक्कीही केली. दरम्यान या संदर्भात शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज बारामतीतील डॉक्टरांची बैठक...
काल झालेल्या या प्रकारानंतर बारामतीतील खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची आज संध्याकाळी मेडीकोज गिल्ड येथे बैठक होत असून या प्रकाराची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

डॉक्टरांची सुरक्षितता आमची जबाबदारी....
कोरोनाच्या काळात रुग्णांना अथक सेवा देणा-या डॉक्टरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांची आहे. बारामतीतील सोळा खाजगी रुग्णालयांसाठी एक अधिकारी व चार पोलिस कर्मचारी नियुक्त केलेले असून दर एक तासाने हे पथक सर्वच दवाखान्याचा आढावा घेणार आहेत. कोणत्याही दवाखान्यात कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल -औदुंबर पाटील, पोलिस निरिक्षक, बारामती शहर पोलिस ठाणे

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)