esakal | 30 वर्षात डॉ. दांपत्याचे १००० पेक्षा अधिक ट्रेक ; तरुणांनी प्रेरणा घ्यावा, असा प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

doctor couple did more than 1000 treks In 30 years

एमबीबीबीएस झाल्यावर राजगुरुनगरमध्ये आधी क्लिनिक, नंतर दहा-बारा बेडचे रुग्णालय थाटून डॉ. मारुती ढवळे लौकिकार्थाने स्थिरावले होते. पस्तिशीनंतर त्र्यंब्यकेश्वरला जाण्याचा योग आला, मात्र वाढत्या वजनाने चढताना खूप दमछाक झाली. लोकांना आरोग्याचे महत्त्व सांगताना, ''आपण मात्र खऱ्या अर्थाने तंदुरुस्त नसल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी डोंगर चढण्याचा नित्यक्रम सुरु केला आणि लगोलग गिरिभ्रमणाला सुरुवात केली.

30 वर्षात डॉ. दांपत्याचे १००० पेक्षा अधिक ट्रेक ; तरुणांनी प्रेरणा घ्यावा, असा प्रवास 

sakal_logo
By
राजेंद्र सांडभोर

राजगुरूनगर : आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी आवश्यकता म्हणून सुरु केलेली गिरि भ्रमंती, नंतर छंद, अन् आता वेड म्हणावी, इतकी जीवनात रुजली आणि डॉक्टर दांपत्याने गेल्या ३० वर्षात १ हजारांच्यावर ट्रेक केले. पैशापेक्षा आरोग्य महत्वाचे असे फक्त म्हटले जाते, पण माणसांकडून तसे आचरण होत नाही. या दाम्पत्याने मात्र आपले काम कमी करून ट्रेकिंगचा छंद जपत आरोग्य आणि आनंद अशा दोन्ही गोष्टी साध्य केल्या आहेत. डॉ. मारुती ढवळे आणि मंदाकिनी ढवळे असे त्यांचे नाव! सातत्यपूर्ण गिरिभ्रमंती आणि निसर्गभटकंती केल्यास संपूर्ण आरोग्य मिळते, असा प्रचार वेगवेगळ्या माध्यमांतून करून, त्यासाठी लोकांना प्रेरित करण्याचे काम ते आता करीत आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
      
एमबीबीबीएस झाल्यावर राजगुरुनगरमध्ये आधी क्लिनिक, नंतर दहा-बारा बेडचे रुग्णालय थाटून डॉ. मारुती ढवळे लौकिकार्थाने स्थिरावले होते. पस्तिशीनंतर त्र्यंब्यकेश्वरला जाण्याचा योग आला, मात्र वाढत्या वजनाने चढताना खूप दमछाक झाली. लोकांना आरोग्याचे महत्त्व सांगताना, ''आपण मात्र खऱ्या अर्थाने तंदुरुस्त नसल्याची जाणीव त्यांना झाली. त्यानंतर त्यांनी डोंगर चढण्याचा नित्यक्रम सुरु केला आणि लगोलग गिरिभ्रमणाला सुरुवात केली. पत्नीलाही त्यांनी शब्दशः सहचर केले आणि दोघांनीच, सह्याद्रीच्या कुशीतील गडकोट, सुळके, घाटवाटा, खिंडी, दऱ्या-खोरी, लेणी, मंदिरे, धबधबे आणि पायवाटा तुडवायला सुरुवात केली. प्रकृती तर उत्तम झालीच, पण पुढे याचा छंदही जडला.
        
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मुलांचे करिअर मार्गी लागल्यावर, तर त्यांनी फक्त ओपीडी चालवायचा निर्णय घेतला. त्यातून नवनवीन स्थळे शोधण्याचे आणि आहे तेच गडकिल्ले वेगळ्या ऋतूत आणि वेगळ्या वाटांनी सर करण्यासाठी ते झपाटून गेले. इतके कि डॉ, ढवळे, त्यांचा २५ ऑगस्टला येणारा प्रत्येक वाढदिवस हरिश्चंद्रगडावर साजरा करतात. त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही एखाद्या गिरीस्थळीच असतो. रविवार तर चुकत नाहीच, उलट जोडीला शनिवार, अजून एखादा सुट्टीचा वार, कधी मित्रांचे नियोजन असलेला ट्रेक, तर आता सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनबरोबर एखादा ट्रेक असतो. सुमारे २५० गडकिल्ले त्यांनी पाहिले. सह्याद्रीतील पन्हाळगड ते विशाळगड, लोणावळा ते भिमाशंकर, राजगड ते तोरणा, राजगड परिक्रमा, रायगड परिक्रमा इत्यादी ट्रेकबरोबर  हिमालयातील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स व हेमकुंड सारखे काही ट्रेकही त्यांनी केले. अमरनाथचा पहलगांम मार्गे परत बालताल असा ५२ किलोमीटरचा ट्रेक त्यांनी दोन दिवसात पुर्ण केला होता.   

डॉक्टरांचे वय आता ६४ असूनही गेल्या वर्षभरात त्यांनी ४६ ट्रेक केले. आता तर १० वर्षांची नात आभाही कधीकधी त्यांच्याबरोबर  ट्रेकला असते. नव्या ट्रेकर्सना ते मार्गदर्शन करतात. गेल्या वर्षी सह्याद्री फाउंडेशनने त्यांना 'पॉवर कपल' पुरस्कार दिला. सध्याच्या स्पर्धेच्या युगात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ताणतणावामुळे निर्माण होणाऱ्या मधुमेह, रक्तदाब, ह्रदयविकार व स्थुलत्व यांसारख्या आजारांवरचा भरमसाठ खर्च आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी लोकांनी गिरीभ्रमण व निसर्गभटकंतीचा पर्याय निवडावा, असे डॉ. ढवळे यांचे मत आहे.
 

loading image