esakal | सलाम! डॉक्टरनेच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवला पेंशटचा जीव; व्हिडिओ पाहा!
sakal

बोलून बातमी शोधा

docter.jpg

कोविड सेंटरमधील एका पेशंटची तब्बेत अचानक खालावली. त्यामुळे पेशंटला आयसीयू असलेल्या हाॅस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागणार होतं. 108 वर संपर्क केला पण अॅम्ब्युलन्सची सोय होत नव्हती. 

सलाम! डॉक्टरनेच अ‍ॅम्ब्युलन्स चालवून वाचवला पेंशटचा जीव; व्हिडिओ पाहा!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : कोविड सेंटरमधील एका पेशंटची तब्बेत अचानक खालावली. त्यामुळे पेशंटला आयसीयू असलेल्या हाॅस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागणार होतं. 108 वर संपर्क केला पण अ‍ॅम्ब्युलन्सची सोय होत नव्हती. कोविड सेंटरमधील अ‍ॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरची तब्येत ठिक नव्हती अन् बदली ड्रायव्हरचा फोनही लागेना. मग करायंच काय?, असा प्रश्न डाॅक्टरांना पडला. एकीकडे पेशंटची स्थिती बिकट होत होती. पेशंटचा जीव वाचवणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे डाॅक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतःच अ‍ॅम्ब्युलन्स चालविली आणि पेशंटला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. काल रात्री पुण्यातील कोविड केअर सेंटरमध्ये हा प्रकार घडला.

पुण्यात फिल्मीस्टाईल थरार; खूनाचा प्रयत्न करणाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग आणि...

काल रात्री पुण्याच्या एका विलागीकरण केंद्रात एका पेशंटची तब्येत अचानक खालावली. पेशंटला आयसीयू असलेल्या हाॅस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागणार होतं. 108 वर संपर्क केला पण अॅम्ब्युलन्सची सोय होत नव्हती. कोविड सेंटरमधील अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरची तब्येत ठिक नव्हती अन् बदली ड्रायव्हरचा फोनही लागेना. पेशंटचे नातेवाईक त्याच सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना सुध्दा पेशंटला दुसऱ्या हाॅस्पिटलमध्ये घेऊन जाणं शक्य नव्हतं. यावेळी डॉ. रणजित निकम व त्यांचे सहकारी डॉ. राजपुरोहित यांनी शेवटी वेळचे महत्व ओळखून निकम आणि डॉ राजपुरोहित यांनी स्वतः अॅम्ब्युलन्स न्यायची ठरवले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. निकम यांनी स्वतः अॅम्ब्युलन्स चालवत पेशंटला दीनानाथ हॉस्पिटल तिथून सह्याद्री हॉस्पिटल येथे नेले. पण बेड उपलब्ध नसल्याने शेवटी त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. विलंब न करता, वेळेवर हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्याने, रुग्णाला वेळेवर उपचार सुरू झाले. त्यामुळे रुग्णाचा जीव वाचला. 
डॉ. निकम आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या  कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

loading image
go to top