
पुणे : डॉक्टरांना फोन येतो तो आजारी असणाऱ्यांचा म्हणजे, एखाद्या रुग्णाचा...पण पुण्यातील कोथरुडमधल्या एका महिला डॉक्टरला फोन आला तो औषधांसाठी नव्हे तर; घरात खायला काहीच नाही, रेशनकार्डही नाही, अशा तक्रारीचा...तेव्हा स्पंदन क्लिनिकच्या त्या डॉक्टर फोनवर बोलणाऱ्या महिलेच्या हदयाचं स्पंदन ओळखले आणि तिच्यासह वारज्यातील अतुलनगरमधल्या ३२ कुटुंबांना पंधरा दिवसांचा किराणा माल घरपोच केला...माणुसकीचं स्पंदन ओळखणाऱ्या त्या डॉक्टर म्हणजे, हेमांगी पाटसकर....
डॉ. हेमांगी यांचे कोथरुडमध्ये छोटेसे क्लिनिक आहे. कोरोनाच्या साथीत अन्य आजारांचे रुग्ण वाढत असल्याने त्या सध्या पूर्णवेळ क्लिनिकमध्ये थांबतात. 'लॉकडाऊन'मुळे लोकांना घरातून बाहेर येणे शक्य नसल्याने त्यांच्या सोयीसाठी डॉ. हेमांगी शक्य तेवढ्या रुग्णांना टेलिफोन कन्सल्टिंग' करतात. परिणामी, त्यांना रोज त्यांच्या जुन्या पेशंटचा फोन आला आणि पुढची महिला म्हणाली, 'डॉक्टर मॅडम, 35 कॉल अटेंड' करावे लागतात. त्यातनच चार दिवसांपूर्वी, डॉ. हेमांगी यांना आम्हाला रेशन मिळत नाही. घरात कुठच्याच वस्तू नाहीत; कुठून तरी काही मदत होईल?' या कॉलने डॉ. हेमांगीच काही मिनिटे अस्वस्थ झाल्या. आपल्या गळ्यात उपकरण बाजुला केले आणि फोनाफोनी करीत लोकांच्या मदतीची जुळवाजुळव सुरू केली. पण मोजक्या वेळेत आणि तेही ३०-३५ कुटुंबांकरिता पटकन कुठची मदत मिळणेही शक्य नव्हते.
अखेर डॉ. हेमांगी यांनी काही प्रमाणात पदरमोड करीत त्या साऱ्या कुटुंबांना १५ दिवस पुरेल इतके किराणा साहित्य खरेदी केले आणि गुरुवारी सायंकाळी ३२ कुटुंबांना घरपोच धान्यही पोचविले. तेव्हा खरे तर एक डॉक्टर म्हणून इतक्या कुटुंबांना मदत करता येईल का? या कात्रीत सापडलेल्या डॉ. हेमांगी यांनी मात्र, २४ तासांत मदत पुरवून गरजूंच्या चेहऱ्यावर समाधान आणले.
इतके हे सारे करताना धान्य घेण्यासाठी लोक गर्दी करणार नाहीत, याचीही काळजी त्या घेत होत्या. तेव्हाच, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरातच राहून कशी काळजी घ्यायची? हेही डॉ. हेमांगी यांनी लोकांना पटवून सांगितले. डॉ. हेमांगी म्हणाल्या, आपल्या किचनमधील डबे जेव्हा रिकामे असतात, तेव्हा त्या महिलांची काय अवस्था होते? हे समजून या महिलांना आवश्यक त्या वस्तू पुरविल्या.
या कुटुंबातील सगळ्याजणी रोगजार करून आपला संसार चालवितात; घर सोडता येत नाही, काम थांबले आहे. तेव्हा त्या घर कशा चालवतील, पण माझ्या मदतीने त्यांना थोडासा का होईना पण दिलासा मिळाला. अशा गरीब आणि गरजुंच्या मदतीसाठी पुढाकार वाढावा.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.