पुणे : धायरी येथे डॉक्टर तरुणाची आत्महत्या

Hanging
Hanging

पुणे - धायरी येथे एका डॉक्टर तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना शनिवारी घडली. दवाखाना व्यवस्थित न चालल्याने तरुणाने इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरु केला होता, मात्र त्या व्यावसायातही आर्थिक नुकसान झाल्याने त्याने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

रुपेश सुरेश पाटील (वय ३१, रा. शर्विल सोसायटी, धायरी) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणाचे नाव आहे. पाटील हे विवाहित होते. त्यांचा धायरी परिसरात छोटा दवाखाना होता. मात्र त्यांचा दवाखाना व्यवस्थित चालत  नसल्याने त्यांनी लॉकडाऊनपूर्वीच इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय सुरू केला होता.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनपूर्वी त्यांची पत्नी व आई वैद्यकीय उपचारांसाठी गुजरातला गेल्या होत्या. पाटील यांना रक्तशर्करा व्याधीनेही ग्रासले होते.दरम्यान,त्यांनी  १९ डिसेंबरला त्यांच्या राहत्या घरात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. त्यांचे घर बंद असल्याने शेजाऱ्याना संशय आला. त्यांनी पोलिसांना याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पाटील यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

या घटनेनंतर पोलिसांकडुन घराची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना तेथे एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये पाटील यांनी त्यांना व्यवसायात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचे नमुद केले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com