जाब मागण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला ससूनमध्ये बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Dnyaneshwar Borade

पुणे येथील ससून रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही महिन्यांपूर्वी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती.

जाब मागण्यासाठी गेलेल्या डॉक्टरला ससूनमध्ये बेदम मारहाण

विश्रांतवाडी - पुणे येथील ससून रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही महिन्यांपूर्वी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती. त्याबाबत चौकशी व जाब मागण्यासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर बोराडे हे ससूनमध्ये अधिष्ठाता कार्यालयातील प्रथम अपीलीय सुनावणीसाठी गेले असता त्यांना तेथे उर्मट वागणूक देऊन तेथील मुख्य प्रशासकीय आणि जन् माहिती अधिकारी गणेश बडदरे यांनी शिवीगाळ करून डॉक्टर बोराडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि पुन्हा ससूनमध्ये दिसल्यास पाय तोडण्यात येतील अशी धमकी देण्यात आली आहे.

मारहाण झालेले डॉक्टर बोराडे हे ससून रुग्णालयात उपचार घेत असून त्यांच्या जीवाला इथून पुढील काळात धोका निर्माण झाला आहे, तरी मारहाण करणाऱ्या व्यक्तीस निलंबित करून पुढील सखोल चौकशी करण्यात यावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा डॉक्टर बोराडे यांनी शासनाला दिला आहे. तरी डॉक्टर बोराडे यांना योग्य तो न्याय मिळावा आणि अधिकारी गणेश बडदरे यांना निलंबित करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा स्वाभिमान ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कॉंग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.

Web Title: Doctor Went To Ask For An Answer Was Beaten In Sassoon Hospital Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top