डॉक्टर पत्नीच्या आत्महत्त्येप्रकरणातील डॉक्टर पती पसार

डॉक्टर पत्नीच्या आत्महत्त्येप्रकरणातील डॉक्टर पती पसार
Published on

फोटो : डॉ. नीलेश जेजुरकर H14039
डॉ मनीषा जेजुरकर H14044


संशयित डॉ. जेजुरकर
अटकेच्या भीतीने पसार

डॉक्टर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : गंगापूर रोड परिसरात डॉक्टर महिलेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याप्रकरणी संशयित पती व जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अटकेच्या भीतीने संशयित डॉ. जेजुरकर पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मानसिक तणाव आणि आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञांच्या घरातच अशी घटना घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

डॉ. नीलेश दत्तात्रय जेजुरकर (वय ४४, रा. रेवती ब्ल्यू अपार्टमेंट, डी. के. नगर, गंगापूर रोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित डॉक्टरचे नाव आहे. त्यांची पत्नी डॉ. मनीषा (वय ४०) यांनी शुक्रवारी (ता. ६) सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृत डॉ. मनीषा यांच्या भगिनी प्रा. रोहिणी वैभव थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत डॉ. मनीषा यांनी पती डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयातील विभागाच्या प्रमुख तज्ज्ञांशी त्यांची जवळीक होती. घरातील बारीकसारीक गोष्टी ते डॉ. चव्हाण यांना सांगत असल्याने घरगुती निर्णयही त्यांच्या सल्ल्यानुसार घेतले जात होते. त्यामुळे २०२१ पासून डॉ. नीलेश यांनी पत्नी डॉ. मनीषा यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सततच्या मानसिक छळामुळे डॉ. मनीषा या मानसिक तणावाखाली होत्या. याच त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सहायक निरीक्षक हर्षल आहिरराव तपास करीत आहेत.

मोबाईलच्या तपासावर पोलिसांचा भर
डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयासह शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पसार असलेले संशयित डॉ. नीलेश जेजुरकर यांच्या मोबाईलचा तंत्रज्ञानाच्या अंगाने तपास केला जाण्याची शक्यता आहे. त्यातून महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com