Doctors are infected with corona virus law quality of PPE Kit BJ Medical college report
Doctors are infected with corona virus law quality of PPE Kit BJ Medical college report

निकृष्ट ‘पीपीई’ किटमुळे डॉक्टरांना होतोय कोरोना

Published on

पुणे : अत्यंत निकृष्ट ‘पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट’ (पीपीई) किट दिले जातात. त्यामुळे डॉक्टरांमध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, असे ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर’च्या (मार्ड) बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या शाखेतर्फे सांगण्यात आले. कोरोनाबाधीतांवर उपचार करण्याऱ्या डॉक्टरांना चांगल्या दर्जाचे ‘पीपीई’ कीट द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. निवासी डॉक्टरांना ससून रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करताना आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्या वेळी संघटनेतर्फे ही माहिती दिली.

ससून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढले आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पीपीई किट दिले जाते. मात्र, सरकारकडून पुरवठा होणाऱ्या या किटचा दर्जा चांगला नसतो. त्यामुळे डॉक्टरांमध्ये ससंर्गाचे प्रमाण वाढले असल्याची माहिती देण्यात आली. ससून रुग्णालयात उपचारांसाठी खाटा वाढवल्या जात आहेत. त्या प्रमाणात करारतत्वावर भरती केलेले डॉक्टर, नर्सेस, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल

हेही वाचा - कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा एकमुखाने पाठिंबा


एक वर्षांपासून निवासी डॉक्टरांचे विशेषज्ञ विभागातील थांबलेले शिक्षण पूर्ववत सुरू करावे. नियोजित शस्त्रक्रिया व अतिविशेषपचार पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने कराव्यात, असे ‘मार्ड’च्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय शाखेचे अध्यक्ष डॉ. विजय यादव आणि सचिव डॉ. ज्ञानेश्वर जामकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास मार्ड संघटनेकडून कडक पाऊले उचलण्यात येतील व त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची राहील, असेही म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com