रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्‍टरांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

रुग्णावर व्यवस्थित उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये घुसत डॉक्‍टरांना मारहाण व रुग्णालयाची तोडफोड केली. कोंढवा येथील वेल्फेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री सव्वादहाला हा प्रकार घडला. 
याप्रकरणी डॉ. सादिक इब्राहिम खान यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे - रुग्णावर व्यवस्थित उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये घुसत डॉक्‍टरांना मारहाण व रुग्णालयाची तोडफोड केली. कोंढवा येथील वेल्फेअर हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री सव्वादहाला हा प्रकार घडला. 
याप्रकरणी डॉ. सादिक इब्राहिम खान यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे मेट्रोची ही स्थानके भूमिगत; तर प्रवाशांसाठी असणार 'या' सुविधा

छातीमध्ये त्रास होत असल्याने शोएब अन्सारी (रा. कोंढवा) यांना त्यांचे नातेवाईक चार फेब्रुवारीला रात्री साडेआठला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. डॉ. खान व डॉ. जुबेर सय्यद त्या वेळी हॉस्पिटलमध्ये होते. अन्सारी यांच्या छातीत इन्फेक्‍शन झाल्याचे व प्लेटलेट्‌स कमी झाल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर बुधवारी दुपारी बाराला डॉ. सय्यद यांनी पेशंटच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा, असे नातेवाइकांना सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्यानंतर पेशंटला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगून ते निघून गेले. त्यानंतर रात्री सव्वा दहाला डॉ. खान हे पेशंटला तपासत असताना चार ते पाच जण आले. त्यांनी डॉ. खान यांना ‘तुमने शोएब अन्सारी के ऊपर अच्छी तरह से ट्रीटमेंट नहीं किया, इसलिए वह मर गया है’, असे म्हणून त्यांना व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर डॉ. खान यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हॉस्पिटलचा मुख्य काचेच्या दरवाजाची तोडफोड केली. गर्दी होऊ लागताच ते पळून गेले. डॉ. खान यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन्स अँड मेडिकेअर सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ॲक्‍टनुसार चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Doctors beat up after death of patient