
पुणे : सूर्योदयाच्या वेळी पूना हॉस्पिटलमधील श्वसनविकारशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. नितीन अभ्यंकर जेव्हा दैनंदिन सवयीप्रमाणे सारसबागेत शतपावली करतात, तेव्हा त्यांच्या संवेदनशील मनाच्या कोपऱ्यामध्ये कवितेच्या ओळीदेखील उमटत असतात. त्या ओळी मोबाईल काढून त्यावर टाइप करत शब्दबद्धही करतात अन् तयार होते समाजातील विविध विषयांचा ठाव घेणारी कविता. आतापर्यंत डॉ. अभ्यंकर अशाप्रकारे तब्बल ९०० कविता लिहिल्या आहेत. तर दोन कवितासंग्रह प्रकाशित केले आहेत. आजच्या डॉक्टर दिनानिमित्त वैद्यकीय पेशा स्वीकारलेले आणि वेगळा छंद जोपासणारे डॉ. अभ्यंकर यांच्यासारखे असे अनेक डॉक्टर आपल्या अवतीभोवती आहेत.