

Pune
esakal
लोणी काळभोर: राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त विश्वराज हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या सेवाभावाला मानवंदना देत उत्साहात कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. अदिती राहुल कराड यांनी डॉक्टरांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा नैतिकतेने आणि जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले. "एआय हा डॉक्टरांचा पर्याय नसून एक सक्षम सहाय्यक आहे. त्याच्या मदतीने निदानाची अचूकता वाढते, वेळेची बचत होते आणि प्रशासकीय कामांचा ताण कमी होतो. त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांवर अधिक प्रभावीपणे लक्ष केंद्रित करता येते," असे त्या म्हणाल्या.