डॉक्टरांचे कष्ट व त्यागाला न्याय देणार; डॉ. मधुरा जोशी

रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयातील डॉक्टरसह सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असतानाही ते सर्व केवळ आपल्यासाठी तहान- भूक, झोपेचा त्याग करत दिवस -रात्र रुग्णांना बरे करण्यासाठी झटत आहेत.
Dr Madhura Joshi
Dr Madhura JoshiSakal

पुणे - रुग्णांच्या (Patients) तुलनेत रुग्णालयातील (Hospital) डॉक्टरसह (Doctor) सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या कमी पडत असतानाही ते सर्व केवळ आपल्यासाठी तहान- भूक, झोपेचा त्याग करत दिवस -रात्र रुग्णांना (Patient) बरे करण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे काही झाले तरी आपण डॉक्टर व रुग्णालयात कार्यरत असलेल्या सर्वांचे प्रयत्न व कष्ट (Work) वाया जाऊ द्यायचे नाही, असे ठरवले आणि सकारात्मक विचार करू लागले, असा अनुभव सांगत होत्या कोरोनातून नुकत्याच बऱ्या झालेल्या (Dr Madhura Joshi) डॉ. मधुरा प्रसाद जोशी. (Doctors hard work and sacrifice will be judged Dr Madhura Joshi)

काही लक्षणे आढळल्यामुळे डॉ. जोशी यांनी चाचणी करून घेतली. त्यांच्या घरातील इतर व्यक्ती निगेटिव्ह तर त्या पॉझिटिव्ह आल्‍या होत्या. त्रास होऊ लागल्याने त्यांना ॲडमिट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र, शहरातील वाढत्या रुग्ण संख्येमुळे बऱ्याच प्रयत्नांनंतर त्यांना बेड मिळाला. रात्री दोनला त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले होते.

Dr Madhura Joshi
कोरोनानंतर मधुमेहींनी घ्या विशेष काळजी; म्युकरमायकॉसीसचे सर्वाधिक रुग्ण मधुमेही

उपचार सुरू असताना त्यांना आलेल्या अनुभवाबाबत त्या म्हणाल्या, ‘‘रुग्णालयात रात्रीचे दोन वाजले तरी वॉर्डमधील स्टाफचे जेवण झालेले नव्हते. पायाला भिंगरी लावल्यासारखी त्यांची पळापळ सुरु होती. आयसीयूमध्ये गेल्यावर वाटलं, आता आयुष्य संपलं. पण त्यानंतर या सर्वांची चाललेली धावपळ बघत असताना मनात पॉझिटिव्ह विचार आले. मनात आले आपण का हरण्याचा विचार करतोय? ही एवढी रुग्णांसाठी दिवसरात्र खपणारी माणसे का करताहेत हे सर्व? का आपल्यासाठी आपल्या घरचे आपली काळजी करताहेत? का आपण बरे व्हावे म्हणून प्रार्थना करताहेत? या सर्वांमुळे मला या आजाराशी लढण्याची नवी उमेद मिळाली आणि काही दिवसांतच मी बरे झाले.’

स्टाफकडून सरप्राईज

‘आयसीयू’तील ते दोन दिवस मला खूप काही शिकवून गेले. बाहेर वॉर्डमध्ये आल्यावरसुद्धा तिथल्या मंडळींनी जे काही केलंय, त्यासाठी शब्दच नाहीत. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मला फ्लोअर स्टाफकडून सरप्राईज मिळाले, ते म्हणजे ‘गेट वेल सून’चे हाताने बनवलेले ग्रीटिंग. पीपीई किटमुळे कोणाचेच चेहरे कळत नव्हते, नावे माहिती नव्हती. त्या सर्व ज्ञात- अज्ञातांत मला परमेश्‍वर दिसल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com