शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खेळ महत्वाचा

शारीरिक व मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खेळ महत्वाचा

Published on

AKJ26B01537
अकलूज (ता. माळशिरास) : येथे महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगच्या उद्‍घाटनप्रसंगी जिल्ह्यातील डॉक्टर्स.
..........
शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचा
...........
डॉ. विलास हरपळे; डॉक्टर्स प्रीमियर लीगचे अकलूज येथे उद्‍घाटन
.........
लवंग, ता. 3 : मानसिक व शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी खेळ महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन सोलापूरचे महिला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विलास हरपळे यांनी केले.
होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन व मिशन आयुर्वेद, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र डॉक्टर्स प्रीमियर लीगचे अकलूज येथे उद्‍घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्यातील डॉक्टर उपस्थित होते.
श्री हरपळे म्हणाले, की मी ७५ वर्षांचा असून आजही कबड्डी खेळत असल्याचे सांगत डॉक्टरांनी आपल्या व्यस्त वेळापत्रकात बदल करून कोणताही मैदानी खेळ खेळल्यास आरोग्य चांगले राहते असा मूलमंत्र दिला.
बार्शीचे ज्येष्ठ होमिओपॅथिक तज्ञ डॉ. कालिदास लिमकर यांनी क्रिकेट हा खेळ श्रीकृष्ण यांच्या काळातील असल्याचे सांगत धावपळीच्या जीवनात मनावरील ताण हलका करण्यासाठी खेळाकडे लक्ष केंद्रित करावे असे सांगितले.
म्हसवडचे डॉ. वसंत मासाळ यांनी स्पर्धेच्या जगात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. संघटनेने पुढाकार घेऊन डॉक्टरांनी आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी जनजागृती म्हणून क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून आलेल्या उमरगा, परभणी, बीड, कोल्हापूर, अहिल्यानगर, बारामती, पुणे, अकलूज, मोहोळ, सातारा या जिल्ह्यातील संघांचा समावेश आहे.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिशन आयुर्वेदाचे अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन गायकवाड, डॉ. अनिल बळते, डॉ. नागनाथ दगडे, डॉ. नितीन कुबेर, डॉ. फैज सय्यद आदींनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रशांत निंबाळकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com