
येरवडा(पुणे): पुणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामध्ये उपनगरातील काही ठिकाणी संवेदनशील किंवा हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत. याठिकाणचे अनेक खासगी दवाखाने बंद झाली आहेत. त्यामुळे काही सामाजिक संस्थांनी नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. डॉक्टरांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्याची शपथ घेतलेली असते. मात्र काही डॉक्टरांनी वस्त्यांमध्ये आरोग्य सेवा देण्यासाठी पाठ फिरविल्याची शोकांतिका समोर आली आहे.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
देशात २४ मार्च पासून लॉकडाऊनची सुरू आहे. यामध्ये दवाखाने, रुग्णालय, मेडिकल आदी वैद्यकीय सेवा सुरू आहेत. वस्त्यांमध्ये खासगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांची संख्या मोठी आहे. सकाळी दहा ते दुपारी दोन तर सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत ही दवाखाने सुरू असतात. मात्र, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने काही प्रभाग व वस्त्या हॉटस्पॉट म्हणून घोषित करताच अनेक डॉक्टरांनी स्वतःहून वस्त्यांमधील दवाखाने लॉकडाऊन केले. त्यामुळे नागरिकांना महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये जाणे अपरिहार्य झाले.
Video : स्थलांतरित पक्ष्यांच्या भारतभ्रमणाचा वेध
महापालिकेच्या दवाखान्यात सर्दी, खोकला व तापाच्या तपासणीसाठी लांबच्या लांब रांग बघून काहींनी मेडिकलमधून गोळ्या औषधे घेेणे पसंत केले. तर काहींनी घरगुती उपचारावर समाधान मानत आहेत. दरम्यान काही सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. उपनगरातील वस्त्यां वस्त्यांमध्ये रुग्णवाहिका जाऊन तेथील नागरिकांना आरोग्यसेवा देतात. यामध्ये स्थानिक नगरसेवकांनी डॉक्टरांची व्यवस्था करण्याची जबाबदारी घेतली आहे. मात्र डॉक्टरांनी हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी जाऊन आरोग्यसेवा देण्यास स्पष्ट नकार दिला. तर काहींनी होकार दिल्यानंतरही त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल गेले. त्यामुळे डॉक्टरच नसल्यामुळे अनेक रुग्णवाहिका बुधवारी सायंकाळपर्यंत जागेवरच उभ्या होत्या. गोळ्या, औषधे असूनही केवळ डॉक्टरांच्या अभावी रुग्णांची तपासणीच होऊ शकली नाही. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय सेवेच्या कर्तव्यापासून माघार घेणार नसल्याची शपथच जणू काही डॉक्टर विसरल्याचे दिसून येते.
‘‘येरवड्यामध्ये ८० टक्के वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांची संख्या आहे. येथील नागरिकांची आरोग्य तपासणी व्हावी म्हणून ‘डॉक्टर आपल्या दारी’ च्या दोन रुग्णवाहिकांची मदत घेतली. मात्र मानधन देऊनही डॉक्टर आरोग्य तपासणी करण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नाही.
''मानधन देणार आहे असे सांगितले तरी ही डाॅक्टर आले नाहीत. त्यामुळे सायंकाळी चार पर्यंत रूग्णवाहिका उभ्या होत्या''
- ॲड अविनाश साळवे, नगरसेवक , पुणे मनपा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.