पुणे : इमारतीच्या जिन्यातील सिमेंटच्या जाळीत श्वानाचे तोंड अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. श्वानाने प्रयत्न करुनही त्याला स्वत:ची सुटका करता आली नाही. अखेर जगण्यासाठी सुरु असलेली त्याची धडपड पाहुन रहिवाशांनी अग्निशामक दलास खबर दिली. त्यानंतर अवघ्या 15 मिनींटातच जवानांनी त्याची सुटका केली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
नवी पेठेतील रत्नदीप सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील जिन्यात असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या जाळीदार भिंतीत एक श्वान अडकल्याची खबर मंगळवारी सकाळी आठ वाजता अग्निशामक दलास मिळाली. त्यानंतर काही वेळातच एरंडवणा अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
श्वानाचे तोंड सिमेंटच्या जाळीत अडकले होते. त्यामुळे जवानानी यंत्राच्या सहाय्याने अतिशय काळजीपूर्वक सिमेंटची जाळी कापली. त्यानंतर श्वानाची सुखरूप सुटका केली. एरंडवणा अग्निशामक दलाचे प्रमुख राजेश जगताप, जवान कार्ले, अमोल शिंदे, सागर सोनवणे, जितेंद्र कुंभार, सचिन वाघोले, शैलेश दवणे, आनंद कांबळे यांच्या पथकाने पंधरा मिनिटात श्वानाची सुटका केली.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.