पुणे - लोहगाव विमानतळावर फिरणाऱ्या १२ भटक्या कुत्र्यांना महापालिकेने पकडले होते. आता त्यांच्यावर नसबंदीची शस्त्रक्रिया करून पुन्हा ते त्याच ठिकाणी सोडावे लागणार आहे. एकीकडे विमानाची, प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची असताना दुसरीकडे नियमांचे पालनही महापालिकेला करावे लागणार आहे.