माहेरून सोने-पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा

माहेरून सोने-पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह चौघांवर गुन्हा
Published on

माहेरून सोने-पैशांसाठी विवाहितेचा छळ
पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध माढा पोलिस ठाण्यात गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
उपळाई बुद्रूक, ता. १७ : माहेरून सोने व पैसे आणण्यासाठी तगादा लावत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मैथिली विक्रांत कदम (वय २१, रा. शिवाजीनगर, माढा) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार पती विक्रांत कदम, दीर अभिषेक कदम, सासू सुलभा कदम आणि सासरे बाळासाहेब कदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून ते १७ सप्टेंबरदरम्यान आरोपींनी फिर्यादीला स्वयंपाक व घरातील कामे नीट करता येत नसल्याचे सांगून त्रास दिला. तसेच पती अन्य महिलेशी व्हिडिओ कॉलवर का बोलतात, असा जाब विचारल्याच्या कारणावरूनही तिच्याशी वाद घातला.
लग्नात मानपान केला नाही, तसेच ठरल्याप्रमाणे सोने दिले नाही, असे म्हणत आरोपींनी माहेरून सोने व पैसे आणण्याची मागणी केली. मात्र, आई-वडिलांकडे काहीही मागणार नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यानंतर आरोपींनी तिला शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच हाताने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस हवालदार गोरे पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com