knife attack
sakal
पुणे - कौटुंबिक वादातून सुनेने ८० वर्षीय सासूवर स्वयंपाकघरातील सुरीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना भारती विद्यापीठ परिसरात घडली. मंगळवारी (ता.१२) दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सुनेला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे.