
लोणी देवकर : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे घरगुती गॅसचा चार चाकी वाहनाच्या साठी सर्रास वापर होत असल्याचे बोलले जात असून अशा वाहनांमध्ये घरगुती गॅस भरत असताना यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या आहेत. मात्र गावासह प्रशासनाचेही अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडवून सर्वसामान्यांना आपला जीव का गमवावा लागण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अशा बाबींची जबाबदारी असणाऱ्या गॅस एजन्सी स्थानिक प्रशासन तालुका प्रशासन यांचे अशा प्रकारांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.