सिलिंडर दरवाढीची सर्वसामान्यांना झळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

domestic lpg cooking gas Cylinder price hike pune

सिलिंडर दरवाढीची सर्वसामान्यांना झळ

पुणे : मुलाची शाळा आता एका महिन्यात सुरु होईल. त्याला नवीन कपडे घ्यावी लागणार आहेत. सासू-सासऱ्यांची औषधे आणायची आहेत. किराणा भरायचा आहे. वीजेचे बिल भरण्यासाठी सारखाच मेसेज येत आहे. एवढा सर्व खर्च पाहता गॅस सिलिंडरसाठी पैसे कसेबसे राखून ठेवले होते. मात्र, त्यात आता वाढ झाल्याने दर महिन्याला पैसे आणायचे तरी कोठून ? असा प्रश्न उपस्थित करून राधिकाबाई मेमाणे गॅस दरवाढीवरून सरकारच्या टीका करत होत्या.

पेट्रोल, डिझेलच्या दरापासून खाद्य तेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्वांच्याच दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे मासिक खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पडला असतानाच गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने गृहिणींना खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीसह सिलिंडरचे दर आता ९९९.५० रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढत आहेत. मात्र त्या तुलनेत उत्पन्न वाढत नाही. सरकारने किमान सर्वसामान्यांचा विचार करून तरी गॅस दर वाढीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नाही तर आम्ही कसे जगावे, ही तरी किमान सांगावे.

- सुवर्णा गवळी, गृहिणी

सर्वसामान्य नागरिक ग्रामिण भागातून शहरात पोट भरण्यासाठी आले आहेत. कसेबसे खर्च भागवून फक्त दिवस पुढे ढकलणे सुरु आहे. वाढत्या महागाईमुळे एक रुपया देखील शिल्लक राहत नाही. महागाईपुढे हात टेकले असून पुन्हा गावात जाऊन तिकडे रोजंदारीवर जावे असे वाटत आहे.

- सारीका भोसले, गृहिणी

तेलाचा डबा घेण्यासाठी सुमारे तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. इतर वस्तूंचेही भाव वाढले आहेत. पेट्रोल वाढले तरी लगेच प्रत्येक वस्तूमागे एक-दोन रुपये वाढत आहेत. दर महिन्याला जर असे होत असेल तर खर्च कसा भागवावा, हा मोठा प्रश्न आहे. गॅस सिलिंडरवर अनुदानही मिळत नाही. एकही रुपयाची बचत होत नाही. अचानक काही अडचण आली तर पैसे कसे उभे करावेत. कोरोनामुळे आता कोणी उसने पैसे देण्यास तयार होत नाही.

- निकीता पवार, गृहिणी

आपले मत कळवा...

वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अशा परिस्थितीमध्ये गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाल्याने खर्चासाठी कसरत करावी लागत आहे. याबाबत आपले मत नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावे.

Web Title: Domestic Lpg Cooking Gas Cylinder Price Hike Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top