मलकापूर अवनी संस्थेमार्फत मजुरांच्या मुलांना पोळ्यांचा आस्वाद

मलकापूर अवनी संस्थेमार्फत मजुरांच्या मुलांना पोळ्यांचा आस्वाद

Published on

अवनी संस्थेकडून ‘पोळी करा दान’ उपक्रम

मलकापुरात गोरगरीब मुलांनी घेतला गोड जेवणाचा आस्वाद

मलकापूर, ता. ७ : दृष्ट आणि वाईट प्रवृत्ती नष्ट करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. त्यामुळे हा सण सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असल्यामुळे तो पर्यावरणपूरक साजरा करावा, म्हणून अवनी संस्थेने उत्सव काळात ‘होळी करा लहान, पोळी करा दान’, असे आवाहन केले होते. त्याला मिळालेल्या प्रतिसादातून नैवेद्य म्हणून होळीत पोळ्या न जाळता त्या जमा करण्यात आल्या. त्यानंतर संस्थेमार्फत गोरगरिबांना वाटून सण आनंदाने साजरा करण्यात आला.
वारुंजी, गोटे, खोडशी या ठिकाणी वीटभट्टीवर काम करण्यासाठी मजूर कर्नाटक या ठिकाणाहून स्थलांतरित होतात. सोबत त्यांची मुलेही असतात. त्यांच्या झोपड्यांवर होळीचा सण साजरा होत नाही. या मुलांना गोड पोळीचा आस्वाद मिळावा, यासाठी अवनी संस्थेमार्फत काही सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत संपर्क साधत ही कल्पना त्यांना सांगितली. कार्यकर्त्यांनी ही संकल्पना लगेच अमलात आणत पोळ्या एकत्र करून सोबत भात, आमटी, तळण, भजी असे सर्व पदार्थ अवनी संस्थेच्या डे केअर सेंटर वरती आणून दिले.
संस्थेमार्फत वीट भट्टीवर जाऊन मुलांना आणि मजुरांना पोटभर पुरणपोळी खाण्याचा आनंद लुटला. पुरणपोळीचा आस्वाद घेत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
या उपक्रमासाठी अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कऱ्हाड विभागातील डे केअर सेंटरवरील शिक्षिका अनिता पाटील, सुजाता पवार, कल्पना काळे, समीना पठाण उपस्थित होत्या. माधुरी पवार, उज्वला शिरसाट, शारदा चावडीमणी, सर्व सिल्वर ओक मधील भगिनींनी सहकार्य केले. राधिका लोखंडे यांनी नियोजन केले.
-------------------------------
01351
मलकापूर : अवनी संस्थेच्या उपक्रमातून पोळ्यांच्या जेवणाचा आस्वाद घेताना वीट भट्टीवरील मजुरांची मुले. (राजेंद्र ननावरे : सकाळ छायाचित्रसेवा)

--------------------------------

Marathi News Esakal
www.esakal.com