kasba ganpati temple
sakal
पुणे - पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा पेठेतील श्री गणपती मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील सुमारे ६० हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. मंदिराचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्यानंतर चोरट्याने दानपेटीचेही कुलूप तोडले.
या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी संग्राम राजेंद्र जाधव (वय २९, रा. गडहिंग्लज, कोल्हापूर) याला अटक केली आहे.