नोकरदार नको, मालक बना - आयुक्त विशाल सोळंकी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

विजेत्या चार शाळांचा गौरव
‘कौशल्योत्सवा’मध्ये चार शाळा विजेत्या ठरल्या. विशाल सोळंकी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यसेनानी हकीम अजमल खान उर्दू विद्यालय येरवडा (पुणे महापालिका), पिंपरी-चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय, थेरगाव (पिंपरी पालिका), लोकमान्य टिळक हायस्कूल खडकी, पुणे (खडकी कॅंटोन्मेंट) आणि महादजी शिंदे माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वानवडी (पुणे कॅंटोन्मेंट), अशी शाळांची नावे आहेत.

पुणे - ‘‘माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व्यावसायिक शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कौशल्योत्सव कार्यक्रमांमुळे व्यावसायिक शिक्षणाला बळ मिळू शकेल. त्यामुळे हे शिक्षण सर्वदूर पोचण्यास मदत होईल,’’ असा विश्‍वास राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केला. कौशल्योत्सवाचा विद्यार्थ्यांना भविष्यात उपयोग होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, नोकरदार नव्हे, तर नोकरी देणारे मालक बना, असा सल्लाही त्यांनी दिला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, समग्र शिक्षण मोहीम, पुणे व खडकी छावणी परिषद आणि लेंड अ हॅंड इंडिया यांच्या वतीने गुरुवारी (ता. ५) ‘कौशल्योत्सव २०१९’चे आयोजन केले होते. या वेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या कमलादेवी आवटे, महापालिकेचे शिक्षणप्रमुख शिवाजी दौंडकर, उपायुक्त संतोष भोर, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या संध्या चव्हाण, लेंड अ हॅंड इंडियाच्या संचालिका सुनंदा माने, व्यवस्थापक महेश रसाळ उपस्थित होते.

कौशल्योत्सवात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमातून विकसित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शनही भरविले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dont be a servant be a owner vishal solanki