ganesh bidkar
sakal
पुणे - प्रभागातील नागरिकांची थेट भेट घेण्याच्या उद्देशाने गेल्या सहा महिन्यांहून अधिक घरोघरी संपर्क प्रस्थापित करताना भारतीय जनता पार्टीचे नेते आणि प्रभाग २४ मधील उमेदवार गणेश बिडकर यांनी जवळपास २० लाख पावले चालण्याचा टप्पा पार केला आहे. प्रभागातील ६० हजार नागरिकांशी किमान तीनदा थेट संपर्क साधण्याचे उद्दिष्ट गणेश बिडकर यांनी या कालावधीत पूर्ण केले आहे.