पुणे - चॉकलेटच्या बहाण्याने सात वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेसह तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.