
पुणे : डेक्कन येथील सह्याद्री रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर लगेचच पतीचा व त्यांना यकृत दान करणाऱ्या पत्नीचा सहा दिवसांनी मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयाने सह्याद्री रुग्णालयाला या प्रकरणाबाबत नोटीस रविवारी बजावली आहे. प्रभारी आरोग्य उपसंचालक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी ही नोटीस रुग्णालयाला बजावली आहे.